समाज
माध्यमे, २०१० नंतर खऱ्या
अर्थाने समाजा मध्ये सर्वात प्रभावशाली प्रचार, प्रसार आणि संपर्कांचे माध्यम
म्हणून समाज माध्यमे जन्मास
आली. २००० चे दशक
हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे होते तर २०११
चे दशक हे स्मार्ट
फोनचे आहे व त्यात
मावणाऱ्या समाज माध्यमांचे आहे.
इंटरनेट च्या माध्यमातून व्यक्ती-व्यक्ती मधील
अंतर मिटले असे म्हणता येईल पण समाज माध्यमांनी एक पायरी पुढे जात व्यक्ती-व्यक्तींना
जोडले आहे. दोन व्यक्ती या समाज माध्यम द्वारे नुसत्या जोडल्या गेल्या नाहीत तर त्यांचे
स्वभाव, आवडी-निवडी, विचार सुख-दुःख या सर्व गोष्टींचे आदान-प्रदान समाज माध्यमांच्या
द्वारे करता येत आहे व हेच सर्वात मोठे कारण आहे ज्यामुळे समाज माध्यमे सर्वात प्रभावशाली
आणि प्रभावित संवादाचे माध्यम आहे. मागील काही वर्षातील किती तरी राजकीय व सामाजिक
घडामोडीचा साक्षीदार समाज माध्यमे राहिली आहेत. मग ती इजिप्त ची क्रांती असो किंवा
अण्णा हजारेंचे दिल्लीतील आंदोलन असो समाज माध्यमे अत्यन्त प्रभावशाली होती या सर्व
घटना घडताना.
आज
आपण या समाज माध्यमांचा व्यापारात आणि विशेष करून अन्न प्रक्रिया उद्योगात कशा प्रकारे
उपयोग करता येईल याचा अभ्यास करणार आहोत. समाज माध्यमांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी
त्याची व्याप्ती जाणून घेणे गरजेचे आहे ते खालील प्रमाणे
|
अ. क्र.
|
वर्ष
|
वापरकर्ते in Billion
|
वापरकर्ते in Crores
|
|
1
|
2016
|
2.14
|
214
|
|
2
|
2018
|
2.62
|
262
|
|
3
|
2021
|
3.02
|
302
|
(Source:- www.statista.com/Number of
world wide social network users year 2018)
भारतात
समाज माध्यमे वापर करते खालील प्रमाणे
|
अ. क्र.
|
वर्ष
|
वापरकर्ते in Million
|
वापरकर्ते in Crores
|
|
1
|
2015
|
142.23
|
14.223
|
|
2
|
2018
|
226.06
|
22.606
|
|
3
|
2021
|
336.18
|
33.618
|
(Source:-
www.statista.com/Number
of Country wise social network users year 2018)
म्हणजे
आजच्या तारखेस भारतात २२.६०६ कोटी लोक कोणत्या न कोणत्या समाज माध्यमाशी निगडित आहेत
आणि त्या द्वारे संवाद साधत आहेत व हा आकडा २०२१ पर्यन्त ३३. ६१ कोटी वर पोहचेल. आता
प्रमुख समाज माध्यमे व त्यांच्या वापरकर्त्यानाची संख्या आपण पाहू,
|
अ. क्र.
|
समाज माध्यमे
|
जागतिक आकडेवारी (कोटीत)
|
|
1
|
Facebook
|
219.6
|
|
2
|
Youtube
|
190.0
|
|
3
|
WhatApp
|
150.0
|
|
4
|
Instagram
|
100.0
|
|
5
|
Twitter
|
33.6
|
|
6
|
WeChat
|
104.0
|
(Source:
www.statist.com/social
Network world wide as on July 2018)
वरील
दोन Statistic च्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट
होती की समाज माध्यमे येणाऱ्या काळात किती प्रभावी प्रचाराची माध्यमे होऊ शकतात. आज
जवळ-जवळ सर्व प्रकारच्या उद्योग क्षेत्रामध्ये समाज माध्यमाचा वापर केला जात आहे, त्यांच्या
उत्पादनांच्या जाहिराती, उत्पादनांचे प्रात्येक्षिक, उत्पादनांची संपूर्ण माहिती व
product/service बुकिंग, online payment या सर्व सुविधा समाज माध्यमातून सहज रित्या
होऊ शकतात. आपण एक-एक करून प्रमुख समाज माध्यमांची माहिती घेऊयात व त्याचा उपयोग अन्न
प्रक्रिया उद्योगा करिता जाणून घेऊयात.
फेसबुक
सर्वात
प्रभावशाली समाज माध्यम आहे, या माध्यमाची निर्मिती २००४ साली एका महाविद्यालयातील
नापास (college dropout) ने केम्ब्रिज विद्यापीठ अमेरिका येथे केली. मुख्य उद्दिष्ट
या साईट चा विद्यापीठातील Networking आणि जुने
मित्र हुडकणे हे होते.
एका
विद्यापीठा पूर्ती मर्यादित असलेली साईट लवकरच जगातील सर्वात प्रभावशाली संपर्क यंत्रनेत
परिवर्तित झाली. २०१० पासून भारतातील सर्वात प्रभावशाली संपर्कित साईट म्हणून ओळखली
जात आहे. या माध्यमातून व्यापाराच्या जाहिराती, प्रचार, प्रसार, व्यवस्थपन या दृष्टिकोनातून
खूप गोष्टी करता येतात. त्याचे थोडक्यात माहिती घेऊयात
अ) फेसबुक अकाउंट
ब) फेसबुक ग्रुप
क) फेसबुक पेज
ü फेसबुक हे छोट्या मोबाईल फोन मध्ये सामावणारी
खूप मोठी व्यापारपेठ आहे. वरील तिन्ही माध्यमातून आपण फेसबुक वर व्यक्ती/व्यक्ती समूह
किंवा संस्था यांच्याशी संपर्कात राहू शकतो.
ü मात्र फेसबुक पेज हे पूर्णतः व्यापारी
दृष्टीकोण ठेऊन निर्माण केले गेलेलं साधन आहे. यात विविध पर्याय द्वारे व्यापार करणे
सोपे होते.
ü या माध्यमात दृकश्राव्य पर्याय उपलब्ध
असल्यामुळे आपण उत्पादनाचे प्रात्यक्षिक, माहिती व जाहिराती दाखवू शकतोत तसेच उत्पादना
बद्दलचे फीडबॅक सुद्धा घेऊ शकतोत. फेसबुक पेजवर आपण share/post केलेली माहिती किती
लोकां पर्यन्त पोहंचली (Reach) याची माहिती आपणास मिळू शकते.
ü उत्पादना बद्दल Survey/Poll आपण घेऊ शकतो.
Live Video शेअर करणे सुद्धा आता फेसबुक पेजच्या द्वारे शक्य आहे.
ü फेसबुक वर अकाउंट, पेज, आणि ग्रुप निर्माण
करण्यास काहीच खर्च येत नाही. तसेच जाहिराती व माहिती शेअर करण्यास सुद्धा खर्च लागत
नाही पण शेअर केलेल्या जाहिराती व माहितीचा पोहोच (Reach) वाढवण्यासाठी खर्च येतो त्याला
sponsor advertise म्हणतात. हा खर्च इतर माध्यमातून येणाऱ्या जाहिरातीच्या खर्चाचा
पेक्षा खूप कमी असतो. sponsor advertise द्वारे ती जाहिरात किती लोकं पर्यन्त पोहचली,
किती लोकांनी ती पहिली, त्या जाहिराती बाबत लोकांची प्रतिक्रिया काय आणि कोणत्या-कोणत्या
ठिकाणावरून पहिली गेली या सर्व बाबी आपणास कळू शकतात.
ü फेसबुक द्वारे आपणास "हॅशटॅग
#" ची सुविधा आपल्याला वापरता येते, कोणत्याही शब्द/एक सलग वाक्य पूर्वी
"#"(हॅशटॅग) लावल्यास त्याची hyper link तयार होते, याचा वापर आपल्या उत्पादनाचे
नाव किंवा मुद्रा नाम (Brand Name) करता येऊ शकतो.
ü फेसबुक वर शब्द व अक्षर मर्यादा नाहीत
तसेच कोणत्याही भाषेत कोणत्याही लिपीत आपण आपली माहिती शेअर करू शकतोत.
WhatApp:-
हे
फार महत्वाचे व खूप परिणाम करणारे माध्यम आहे. या माध्यमावर एक मनुष्य दिवसाचे दोन
तास व्यतीत करत असतो. संवादाचे व संपर्काचे खूप प्रभावी माध्यम आज WhatApp बनले आहे.
इतर समाज माध्यमं प्रमाणे या माध्यमात सुद्धा आपण आपले विचार लिखित, दृकश्राव्य
(Audio Visual), ऑडिओ, फोटो द्वारे शेअर करू शकतोत. या माध्यमात सुद्धा ग्रुप निर्माण
करून तुमचे उत्पादन/सेवा उपभोक्त्या पर्यन्त पोहचवता येते. एका ग्रुप मध्ये साधारणतः
२५० आसपास व्यक्ती असू शकतात, त्याच बरोबर मेसेज Broadcast सुद्धा करता येतात.
WhatApp वर शब्दांची व जागेची मर्यादा नाही.
Twitter: -
Twitter
हे सुद्धा फेसबुक सारखेच समाज माध्यम आहे, याला Micro Blogger साईट म्हणतात. फेसबुक
प्रमाणेच माहितीची देवाण-घेवाण या माध्यमातून करता येते, Twitter वर शेअर केलेल्या
माहितीला ट्विट(Tweet) असे म्हणतात. या समाज माध्यमात मात्र शब्दानं करता व जागेची
मर्यादा आहे साधारण पणे २८० अक्षरे(characters) एका ट्विट मध्ये असू शकतात. twitter
वर सुद्धा फेसबुक प्रमाणेच Live विडिओ शेअर
करणे, Audio Visual दाखवणे, फोटो शेअर करणे, हॅशटॅग हे पर्याय उपलब्ध आहेत व याचा वापर
करून जाहिराती Broadcast करता येतात. Twitter वर सुद्धा sponsor advertise करता येतात
व त्याचा सुद्धा खर्च अगदी नाम मात्र असतो. Twitter वर व्यवसायाचे ग्रुप व पेज तयार
करता येत नाही फक्त twitter account असते व त्याला Twitter Handle असे म्हणतात.
Youtube
हे
गूगल ने तयार केलेल दृकश्राव्य (Audio Visual) माध्यम आहे, या करीत गुगल अकाउंट असणे
गरजेचे आहे. ब्रँड नेम अथवा उत्पादनाच्या नावाने
Youtube चॅनल सुरु करता येते. या माध्यमातून उत्पादनाच्या जाहिराती, प्रात्यक्षिके
व इतर माहिती Audio Visual स्वरूपात दाखवता येते. या माध्यमात सुद्धा माहितीचा
Reach जाणून घेता येतो. Youtube वर सुद्धा sponsor advertise करता येतात व त्याचा सुद्धा
खर्च इतर समाज माध्यमा प्रमाणेच अगदी नाम मात्र असतो.
वरील
सर्व समाज माध्यमे आपल्याला व्यवसाय वाढी करिता खूप उपयोगी तर पडतच असतात पण सामाजिक
जाणिवा सुद्धा निर्माण करण्याचे काम हे समाज माध्यमे करत असतात. समाज माध्यमे हे दुधारी
तलवारी सारखी असतात, व त्याचा योग्य उपयोग न झाल्यास आपल्या उत्पादनाला सुद्धा त्याचा
फटका बसू शकतो. योग्य माध्यमाचा उपयोग करून आपले उत्पादन बाजारपेठेत आणल्यास निश्चित
त्याच फायदा होतो.
धन्यवाद
विराज
वि देवडीकर
०९९२३४५९२०२

No comments:
Post a Comment