Wednesday, 17 October 2018

मार्केटिंग आणि समाज माध्यमे


समाज माध्यमे, २०१० नंतर खऱ्या अर्थाने समाजा मध्ये सर्वात प्रभावशाली प्रचार, प्रसार आणि संपर्कांचे माध्यम म्हणून समाज माध्यमे जन्मास आली. २००० चे दशक हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे होते तर २०११ चे दशक हे स्मार्ट फोनचे आहे त्यात मावणाऱ्या समाज माध्यमांचे आहे. इंटरनेट च्या माध्यमातून व्यक्ती-व्यक्ती मधील अंतर मिटले असे म्हणता येईल पण समाज माध्यमांनी एक पायरी पुढे जात व्यक्ती-व्यक्तींना जोडले आहे. दोन व्यक्ती या समाज माध्यम द्वारे नुसत्या जोडल्या गेल्या नाहीत तर त्यांचे स्वभाव, आवडी-निवडी, विचार सुख-दुःख या सर्व गोष्टींचे आदान-प्रदान समाज माध्यमांच्या द्वारे करता येत आहे व हेच सर्वात मोठे कारण आहे ज्यामुळे समाज माध्यमे सर्वात प्रभावशाली आणि प्रभावित संवादाचे माध्यम आहे. मागील काही वर्षातील किती तरी राजकीय व सामाजिक घडामोडीचा साक्षीदार समाज माध्यमे राहिली आहेत. मग ती इजिप्त ची क्रांती असो किंवा अण्णा हजारेंचे दिल्लीतील आंदोलन असो समाज माध्यमे अत्यन्त प्रभावशाली होती या सर्व घटना घडताना.
आज आपण या समाज माध्यमांचा व्यापारात आणि विशेष करून अन्न प्रक्रिया उद्योगात कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा अभ्यास करणार आहोत. समाज माध्यमांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी त्याची व्याप्ती जाणून घेणे गरजेचे आहे ते खालील प्रमाणे
अ. क्र.
वर्ष
वापरकर्ते in Billion
वापरकर्ते  in Crores
1
2016
2.14
214
2
2018
2.62
262
3
2021
3.02
302
 (Source:- www.statista.com/Number of world wide social network users year 2018)
भारतात समाज माध्यमे वापर करते  खालील प्रमाणे
अ. क्र.
वर्ष
वापरकर्ते in Million
वापरकर्ते  in Crores
1
2015
142.23
                  14.223
2
2018
226.06
22.606
3
2021
336.18
33.618
(Source:- www.statista.com/Number of Country wise social network users year 2018)
म्हणजे आजच्या तारखेस भारतात २२.६०६ कोटी लोक कोणत्या न कोणत्या समाज माध्यमाशी निगडित आहेत आणि त्या द्वारे संवाद साधत आहेत व हा आकडा २०२१ पर्यन्त ३३. ६१ कोटी वर पोहचेल. आता प्रमुख समाज माध्यमे व त्यांच्या वापरकर्त्यानाची संख्या आपण पाहू, 

अ. क्र.
समाज माध्यमे
जागतिक आकडेवारी (कोटीत)
1
Facebook
219.6
2
Youtube
190.0
3
WhatApp
150.0
4
Instagram
100.0
5
Twitter
33.6
6
WeChat
104.0
(Source: www.statist.com/social Network  world wide as on July 2018)

वरील दोन Statistic  च्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट होती की समाज माध्यमे येणाऱ्या काळात किती प्रभावी प्रचाराची माध्यमे होऊ शकतात. आज जवळ-जवळ सर्व प्रकारच्या उद्योग क्षेत्रामध्ये समाज माध्यमाचा वापर केला जात आहे, त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती, उत्पादनांचे प्रात्येक्षिक, उत्पादनांची संपूर्ण माहिती व product/service बुकिंग, online payment या सर्व सुविधा समाज माध्यमातून सहज रित्या होऊ शकतात. आपण एक-एक करून प्रमुख समाज माध्यमांची माहिती घेऊयात व त्याचा उपयोग अन्न प्रक्रिया उद्योगा करिता जाणून घेऊयात.

फेसबुक
सर्वात प्रभावशाली समाज माध्यम आहे, या माध्यमाची निर्मिती २००४ साली एका महाविद्यालयातील नापास (college dropout) ने केम्ब्रिज विद्यापीठ अमेरिका येथे केली. मुख्य उद्दिष्ट या साईट चा विद्यापीठातील  Networking आणि जुने मित्र हुडकणे हे होते.
एका विद्यापीठा पूर्ती मर्यादित असलेली साईट लवकरच जगातील सर्वात प्रभावशाली संपर्क यंत्रनेत परिवर्तित झाली. २०१० पासून भारतातील सर्वात प्रभावशाली संपर्कित साईट म्हणून ओळखली जात आहे. या माध्यमातून व्यापाराच्या जाहिराती, प्रचार, प्रसार, व्यवस्थपन या दृष्टिकोनातून खूप गोष्टी करता येतात. त्याचे थोडक्यात माहिती घेऊयात
अ) फेसबुक अकाउंट
ब) फेसबुक ग्रुप
क) फेसबुक पेज
ü  फेसबुक हे छोट्या मोबाईल फोन मध्ये सामावणारी खूप मोठी व्यापारपेठ आहे. वरील तिन्ही माध्यमातून आपण फेसबुक वर व्यक्ती/व्यक्ती समूह किंवा संस्था यांच्याशी संपर्कात राहू शकतो. 
ü  मात्र फेसबुक पेज हे पूर्णतः व्यापारी दृष्टीकोण ठेऊन निर्माण केले गेलेलं साधन आहे. यात विविध पर्याय द्वारे व्यापार करणे सोपे होते.
ü  या माध्यमात दृकश्राव्य पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपण उत्पादनाचे प्रात्यक्षिक, माहिती व जाहिराती दाखवू शकतोत तसेच उत्पादना बद्दलचे फीडबॅक सुद्धा घेऊ शकतोत. फेसबुक पेजवर आपण share/post केलेली माहिती किती लोकां पर्यन्त पोहंचली (Reach) याची माहिती आपणास मिळू शकते.
ü  उत्पादना बद्दल Survey/Poll आपण घेऊ शकतो. Live Video शेअर करणे सुद्धा आता फेसबुक पेजच्या द्वारे शक्य आहे.
ü  फेसबुक वर अकाउंट, पेज, आणि ग्रुप निर्माण करण्यास काहीच खर्च येत नाही. तसेच जाहिराती व माहिती शेअर करण्यास सुद्धा खर्च लागत नाही पण शेअर केलेल्या जाहिराती व माहितीचा पोहोच (Reach) वाढवण्यासाठी खर्च येतो त्याला sponsor advertise म्हणतात. हा खर्च इतर माध्यमातून येणाऱ्या जाहिरातीच्या खर्चाचा पेक्षा खूप कमी असतो. sponsor advertise द्वारे ती जाहिरात किती लोकं पर्यन्त पोहचली, किती लोकांनी ती पहिली, त्या जाहिराती बाबत लोकांची प्रतिक्रिया काय आणि कोणत्या-कोणत्या ठिकाणावरून पहिली गेली या सर्व बाबी आपणास कळू शकतात.
ü  फेसबुक द्वारे आपणास "हॅशटॅग #" ची सुविधा आपल्याला वापरता येते, कोणत्याही शब्द/एक सलग वाक्य पूर्वी "#"(हॅशटॅग) लावल्यास त्याची hyper link तयार होते, याचा वापर आपल्या उत्पादनाचे नाव किंवा मुद्रा नाम (Brand Name) करता येऊ शकतो.
ü  फेसबुक वर शब्द व अक्षर मर्यादा नाहीत तसेच कोणत्याही भाषेत कोणत्याही लिपीत आपण आपली माहिती शेअर करू शकतोत.
WhatApp:-
हे फार महत्वाचे व खूप परिणाम करणारे माध्यम आहे. या माध्यमावर एक मनुष्य दिवसाचे दोन तास व्यतीत करत असतो. संवादाचे व संपर्काचे खूप प्रभावी माध्यम आज WhatApp बनले आहे. इतर समाज माध्यमं प्रमाणे या माध्यमात सुद्धा आपण आपले विचार लिखित, दृकश्राव्य (Audio Visual), ऑडिओ, फोटो द्वारे शेअर करू शकतोत. या माध्यमात सुद्धा ग्रुप निर्माण करून तुमचे उत्पादन/सेवा उपभोक्त्या पर्यन्त पोहचवता येते. एका ग्रुप मध्ये साधारणतः २५० आसपास व्यक्ती असू शकतात, त्याच बरोबर मेसेज Broadcast सुद्धा करता येतात. WhatApp वर शब्दांची व जागेची मर्यादा नाही.

Twitter: -
Twitter हे सुद्धा फेसबुक सारखेच समाज माध्यम आहे, याला Micro Blogger साईट म्हणतात. फेसबुक प्रमाणेच माहितीची देवाण-घेवाण या माध्यमातून करता येते, Twitter वर शेअर केलेल्या माहितीला ट्विट(Tweet) असे म्हणतात. या समाज माध्यमात मात्र शब्दानं करता व जागेची मर्यादा आहे साधारण पणे २८० अक्षरे(characters) एका ट्विट मध्ये असू शकतात. twitter वर सुद्धा फेसबुक प्रमाणेच  Live विडिओ शेअर करणे, Audio Visual दाखवणे, फोटो शेअर करणे, हॅशटॅग हे पर्याय उपलब्ध आहेत व याचा वापर करून जाहिराती Broadcast करता येतात. Twitter वर सुद्धा sponsor advertise करता येतात व त्याचा सुद्धा खर्च अगदी नाम मात्र असतो. Twitter वर व्यवसायाचे ग्रुप व पेज तयार करता येत नाही फक्त twitter account असते व त्याला Twitter Handle असे म्हणतात. 
Youtube
हे गूगल ने तयार केलेल दृकश्राव्य (Audio Visual) माध्यम आहे, या करीत गुगल अकाउंट असणे गरजेचे आहे.  ब्रँड नेम अथवा उत्पादनाच्या नावाने Youtube चॅनल सुरु करता येते. या माध्यमातून उत्पादनाच्या जाहिराती, प्रात्यक्षिके व इतर माहिती Audio Visual स्वरूपात दाखवता येते. या माध्यमात सुद्धा माहितीचा Reach जाणून घेता येतो. Youtube वर सुद्धा sponsor advertise करता येतात व त्याचा सुद्धा खर्च इतर समाज माध्यमा प्रमाणेच अगदी नाम मात्र असतो.  
वरील सर्व समाज माध्यमे आपल्याला व्यवसाय वाढी करिता खूप उपयोगी तर पडतच असतात पण सामाजिक जाणिवा सुद्धा निर्माण करण्याचे काम हे समाज माध्यमे करत असतात. समाज माध्यमे हे दुधारी तलवारी सारखी असतात, व त्याचा योग्य उपयोग न झाल्यास आपल्या उत्पादनाला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो. योग्य माध्यमाचा उपयोग करून आपले उत्पादन बाजारपेठेत आणल्यास निश्चित त्याच फायदा होतो.

धन्यवाद


विराज वि देवडीकर
०९९२३४५९२०२

अन्न प्रक्रिया उद्योग आणि त्याची मार्केटिंग


कोणत्याही उद्योगात तीन महत्वाचे टप्पे असतात
Ø  उत्पादन (Production)
Ø  विपणन व्यवस्थापन (Marketing Management)
Ø  विक्री नंतरची सेवा (Post sale service)
या मधील सर्वात महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे विपणन व्यवस्थापन किंवा सध्या भाषेत मार्केटिंग मॅनॅजमेण्ट. उत्पादन योग्य माध्यमातून, योग्य पद्धतीने, योग्य वेळेत, योग्य दरात विक्री करणे म्हणजे मार्केटिंग होय. 
American Marketing Association (AMA) ने मार्केटिंग ची जी व्याख्या केली आहे ती खालील प्रमाणे,
“The performance of business activity that direct the flow of goods & services from producer to consumer or user”
अत्यंत सोप्या पद्धतीने मार्केटिंग ची व्याख्या AMA ने केली आहे, एक अशी पद्धत ज्यानुसार ज्यामुळे वस्तू सेवा यांचा प्रवास सरळ उत्पादक ते उपभोक्ता (End user) पर्यंत करणे म्हणजे मार्केटिंग होय. १९व्या २०व्या शतकाच्या सुरवातीस झालेल्या औद्योगिक क्रांतीतून नवीन विपणन शास्त्र/ धोरण जन्मास आले त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. 

मार्केटिंग मॅनॅजमेन्ट या विषयाला दोन प्रमुख भागात विभागता येते त्यातील
Ø  मार्केटिंग
Ø  विक्री (Sale)
या दोन्ही भागांना एकत्रित पणे मार्केटिंग मॅनॅजमेण्ट असे म्हटले जाते. यातील मार्केटिंग विक्री हे वेगवेगळे प्रकार असून एकमेकांस पूरक असतात. वस्तू सेवा विक्री हे मार्केटिंग वर अवलंबून असते. कोणत्याही वस्तू सेवा उद्योगात मार्केटिंगचे नियम पद्धती समानच असतात मग ते उत्पादन नाशवंत (Perishable) असे किंवा दीर्घायुषी (NonPerishable) असो. अन्न प्रक्रिया उद्योगात मार्केटिंग चा अभ्यास करताना आपल्याला त्याच नियमांचा विचार करावा लागतो जे इतर उद्योग क्षेत्राला लागू पडतात. मात्र अन्न प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे उत्पादनाचे असलेले आयुष्य ज्याला Shelf Life म्हणता येते. कारण ही उत्पादने मानवाचे अन्न म्हणून उपयोगात येत असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम मानवाच्या आरोग्यावर कालबाह्यते (Expiry) नंतर होऊ शकतात तसेच अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर त्यावर असते. त्यामुळे Expiry date(कालबाह्य तारीख) व Shelf Life हे या अभ्यासात फार महत्वाचे ठरतात.
मार्केटिंग मॅनॅजमंट  चार प्रमुख घटकांत विभागले आहेत त्याला मार्केटिंग चे 4P’s  म्हणतात.
Ø  Product
Ø  Price
Ø  Promotion
Ø  Place
याची थोडक्यात माहिती घेऊ अन्न प्रक्रिया मध्ये याचा उपयोग पाहू.
Product Mix:- या मध्ये खालील घटकांचा समावेश होतो, Brand Name, Product Color, Product Design, Product Packaging, Product line(Range), Warrant & Service.
Price Mix:- या दुसऱ्या "P" मध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. Pricing Strategy, Price Policy, Basic Price, Terms of Credit, Discount & Allowance. Price mix मध्ये आर्थिक बाबीशी निगडित आहे. Dealer incentive, Customer discount, Dealer Credit limit या इतर गोष्टी या मध्ये येतात.
Promotion Mix:-  या तिसऱ्या प्रकारात Personal selling, advertising, Publicity, Sale Promotion (Dealer aids & Consumer aids). Promotion mix मध्ये प्रत्येक्ष उत्पादनाचा प्रचार, प्रसार व विक्री केली जाते. उत्पादन/सेवा जास्ती-जास्त उपभोक्त्याच्या नजरे समोर ठेवणे व त्यातून उत्पादनाची/सेवेची विक्री करणे हा उद्देश Promotion Mix चा असतो.
Place Mix:- या चौथ्या शेवटच्या प्रकारात
१)       Distribution Channel:- ज्यात Distributor-Wholesaler-Retailer-End Consumer येतात, याला Supply Chain सुद्धा म्हणता येते. उत्पादन कंपनी मधून निघून उपभोक्त्याच्या हातात पडे पर्यंत वेग-वेगळ्या distribution channel मध्ये असतात. मार्केटिंग मॅनॅजमंट मध्ये Distributor, Wholesaler नियुक्त करणे फार महत्वाचे असते त्यामुळे उत्पादनाच्या प्रवास सुलभ होतो.  
२)      Physical Distribution:- यात Transport, Warehousing आणि Inventory यांचा समावेश होतो. अन्न प्रक्रिया उद्योगात Transport आणि Warehousing  फार महत्व असते. नाशवंत उत्पादने (Perishable goods) असल्यामुळे थंड वातावरणांत साठवणूक करावी लागतात, त्याला शीतगृहे (Cold Storage) म्हणतात त्यामुळे उत्पादनाचे Shelf life वाढते.



मनुष्यबळ व्यवस्थापन:-
 हा एका फार महत्वाचा जरुरीचं भाग मार्केटिंग मॅनॅजमेण्ट मध्ये येतो. अन्न प्रक्रिया उद्योगात नाशवंत उत्पादने असल्यामुळे योग्य वेळेत उत्पादने दुकानापर्यंत पोहचवणे त्याची विक्री होणे गरजेचे आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भागात विभाजन करता येते.
Ø  विक्री संच (Sales Team)
Ø  ) प्रचार संच (Promotion Team)
Ø  पुरवठा साखळी संच (Supply Chain Team)
) विक्री संच (Sales Team):-
विक्री संच फक्त उत्पादने/सेवा विक्रीचे कामे करतात. प्रत्येक किरकोळ व्यापाऱ्याकडे जाऊन उत्पादन/सेवा विक्री केली जाते. या टीम ला उत्पादनाची संपूर्ण माहिती असावी लागते ती माहिती योग्य पद्धतींने व्यापाऱ्या समोर मांडता यावी लागते त्याला "Sales Speech" म्हणतात. याचे विशिष्ठ प्रशिक्षण या टीम ला दिलेले असते. फक्त व्यापारीच नाही तर उपभोक्ता (End users) ला खरेदी करता पटविण्याचे काम ही टीम करत असते. उत्पादने विक्री सोबत त्याचे आर्थिक व्यवहार सुद्धा ही टीम बघत असते, जसे की Repayment, Discount, Retailer Scam, etc.
) प्रचार संच:-
Sales team करीत पूरक काम ही टीम करत असते, या टीम च्या माध्यमातून उत्पादनाचा प्रचार प्रसार केला जातो. ग्राहकाने उत्पादने विकत घ्यावीत या करीत उत्पादनाची अशा पद्धतीने सजावट करणे ज्यमुळे उत्पादने जास्ती-जास्त वेळ ग्राहकाच्या नजरे समोर राहील त्याला ग्राहक विकत घेईल हे सर्वात महत्वाचे काम ही टीम करते.  Poster, Banner, Shelf Display, Event Promotion, Advertising (Print & Electronic), Social Media Marketing ही सर्व कामे या टीम च्या मार्फत केली जातात, त्याच बरोबर अन्न प्रक्रिया उद्योग असल्यामुळे नाशवंत उत्पादन करीत cold storage unit म्हणजे Refrigerator, Versicolor, Chiller इत्यादी उपकरने व्यापाऱ्याला उपलब्ध करून देणे व त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे हे सुद्धा या टीम चे काम असतात.
क)    पुरवठा साखळी संच:-
नावा प्रमाणे ही टीम मागणी पुरवठ्याचे काम करते, उत्पादनाचा कंपनी ते किरकोळ व्यापारी हा प्रवास या टीम च्या माध्यमातून होत असतो. ही टीम Distributor नियुक्त करणे, नियुक्त distributor पर्यंत कंपनी ची सर्व उत्पादने पोहचवणे, कालबाह्य झालेली उत्पादने वापस कंपनी मध्ये पाठवणे, उत्पादना सोबत असलेल्या Gift/Free items ला व्यापाऱ्या पर्यन्त पोहंचवणे हे कामे ही टीम करते. 
युनिक सेल्लिंग प्रपोशन (USP):-
प्रत्येक उत्पादनाचा स्वतःची ओळख असलेला मुद्दे/गोष्ट ज्याचा वापर करून उत्पादने विक्री केली जाते त्याला युनिक सेल्लिंग पॉईंट (USP) म्हणतात. त्याची व्याख्या पुढील प्रमाणे
“A unique selling proposition (USP, also seen as unique selling point) is a factor that differentiates a product from its competitors, such as the lowest cost, the highest quality or the first-ever product of its kind. A USP could be thought of as “what you have that competitors don’t.”
अर्थात एक असा मुद्दे/गोष्ट जी आपल्या उत्पादनाला प्रतिस्पर्धी उत्पादन पासून वेगळे करते जसे की कमी किंमत, उत्तम गुणवत्ता किंवा या प्रकारचे प्रथम उत्पादन म्हणजे Unique Selling Proposition.
उदाहणार्थ:
) डॉमिनोज पिझ्झा ३० मिनिटात घरपोच सेवा अन्यथा पूर्ण पणे मोफत
) विक्रम चहा- ताजेपणा आणि कडक
)अमूल- “The Taste of India”
) Thums Up – “Taste the Thunder”
याचा उपयोग करून उत्पादने विक्री करणे सोपी जातात तसेच प्रतिस्पर्धी उत्पादनापेक्षा आपले उत्पादन कसे उत्तम आहे हे दाखवता येते. उत्पादनाची स्वतःची व्यवसायिक ओळख निर्माण करता येते. उत्पादन विक्रीवर याचा खूप मोठा परिणाम होत असतो. उत्पादनाची कंपनी ची Brand value (मुद्रा मूल्य) तयार होत असते. 
वरील सर्व चर्चा आपले उत्पादन कशा प्रकारे जास्तीसत खपाचे होऊ शकते याची होती, ते कशा प्रकारे जास्ती जास्त लोकां पर्यन्त पोहचू शकेल याचे होती, आपल्या उत्पादनाचा खप वाढावा त्यातून कंपनीला चांगला नफा निर्माण व्हावा हेच पहिले अंतिम उद्दिष्ट विपणन व्यवस्थपन किंवा मार्केटिंग मॅनॅजमेण्ट चे असते. व्यवस्थपन क्षेत्रात मार्केटिंगचा अभ्यास करताना या मूलभूत घटकांचा सर्वात जास्त विचार केला जातो.
धन्यवाद

विराज विजयकुमार देवडीकर
०९९२३४५९२०२

(Ref.Books:- Dynamics of Entrepreneurial Development & Management by Vasant Desai)


मार्केटिंग आणि समाज माध्यमे

समाज माध्यमे , २०१० नंतर खऱ्या अर्थाने समाजा मध्ये सर्वात प्रभावशाली प्रचार , प्रसार आणि संपर्कांचे माध्यम म्हणून समाज माध...